फिफा : पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाची स्पेनवर मात
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2018 10:52 PM (IST)
रशियाकडून स्मोलोव्ह, इग्नाशेविच, गोलोविन आणि चेरिशेव्ह यांनी शूटआऊटमध्ये सलग चार गोलची नोंद केली. स्पेनकडून इनिएस्टा, पिके, रामोस यांना शूटआऊटमध्ये गोल झळकावता आला.
रशिया : यजमान रशियानं फिफा विश्वचषकात आज सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली. रशियानं शूटआऊटमध्ये स्पेनचा ४-३ असा पराभव करून, गेल्या ४८ वर्षांत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. स्पेन आणि रशिया संघांमधला हा सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरही १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळं बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी शूटआऊट खेळवण्यात आला. त्यात रशियाचा गोलरक्षक अगोर अकिनफिव्हनं स्पेनच्या कोके आणि अस्पासच्या किक थोपवून कमाल केली. रशियाकडून स्मोलोव्ह, इग्नाशेविच, गोलोविन आणि चेरिशेव्ह यांनी शूटआऊटमध्ये सलग चार गोलची नोंद केली. स्पेनकडून इनिएस्टा, पिके, रामोस यांना शूटआऊटमध्ये गोल झळकावता आला.