मॉस्को : इंग्लंडने पनामाचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत फिफा विश्वचषकाची बाद फेरी गाठली. साखळी फेरीतल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा अक्षरश: फडशा पाडला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 22, 45 आणि 62 व्या मिनिटाला गोल डागत हॅटट्रिक साजरी केली. केनने यातले दोन गोल हे पेनल्टीवर नोंदवले. हॅरी केनने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत दोन सामन्यात सर्वाधिक पाच गोल नोंदवले आहेत.
याशिवाय इंग्लंडकडून जॉन स्टोन्सने दोन तर जेसी लिनगार्डने एका गोलची नोंद केली. या सामन्यात इंग्लंडने पूर्वार्धात 5-0 अशी आघाडी घेतली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडने पहिल्यांदाच सामन्याच्या पहिल्याच सत्रात पाच गोल डागण्याची किमया साधली.
पनामाकडून 78 व्या मिनिटाला फिलिप बेलॉयने एकमेव गोल नोंदवला. पनामाचा विश्वचषकातला हा पहिलाच गोल ठरला.
याआधी ग गटातल्या सलामीच्या लढतीत इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 ने विजय मिळवला होता.
पनामाचा 6-1 ने धुव्वा, इंग्लंडचा बाद फेरीत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 08:52 PM (IST)
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 22, 45 आणि 62 व्या मिनिटाला गोल डागत हॅटट्रिक साजरी केली. याशिवाय इंग्लंडकडून जॉन स्टोन्सने दोन तर जेसी लिनगार्डने एका गोलची नोंद केली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -