CCTV : कुर्ला स्टेशनवर भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने जीवन संपवलं
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 24 Jun 2018 06:14 PM (IST)
मुंबईतील ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कुर्ला स्थानकात भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबई : मुंबईतील ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कुर्ला स्थानकात भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरुन जाणाऱ्या भरधाव ट्रेनसमोर उडी टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुरुवातीला हा तरुण उडी मारण्यास धजावत नव्हता मात्र नंतर हिंमत करुन त्याने धावत्या ट्रेनखाली उडी टाकली. पोलिसांनी याप्रकरणी एडिआर दाखल करुन घेतली आहे. पाहा व्हिडीओ :