मुंबई : भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन ट्रॉफीत ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. पहिल्या सामन्यात काल भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली होती.
अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत सिंह आणि मनदीप सिंहने प्रत्येकी एक एक गोल नोंदवला. हरमनप्रीतने 17 व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत सामन्यात भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. नंतर 28 व्या मिनिटाला मनदीपने गोल करत अर्जेंटिनाच्या अडचणीत भर टाकली. अर्जेंटिनाला केवळ एकच गोल करता आला आणि भारताने 2-1 ने हा सामना जिंकला.
भारताचा अनुभवी दिग्गज खेळाडू सरदार सिंहचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता.
दरम्यान, याआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4-0 ने लोळवलं होतं.
हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अर्जेंटिनावर 2-1 ने विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 06:48 PM (IST)
भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन ट्रॉफीत ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. पहिल्या सामन्यात काल भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -