मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला आहे. या पराभवामुळं इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बेल्जियम आणि इंग्लंड याच दोन संघांनी ग गटातून बाद फेरीत धडक मारली.
कालिनग्राड स्टेडियमध्ये गुरूवारी रात्री हा सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. पहिल्या हाफ मध्ये कोणत्याही टीमला गोल करता आला नाही. पहिला हाफ 0-0 असा गोलरहित राहिला.
दुसऱ्या हाफमध्य़े 51 व्या मिनिटाला बेल्जियमच्या अदनान जानुझाजने गोल केला. याच गोलवर बेल्जियमने इंग्लंडवर 1-0 ने मात केली. बेल्जियमचा हा सलग तिसरा विजय ठरला. बेल्जियमनं तीनपैकी तीन सामने जिंकून ‘ग’ गटावर निर्विवाद वर्चस्व राखलं.
बाद फेरीत इंग्लंडचा सामना कोलंबियाशी 3 जुलै रोजी होणार आहे. तर बेल्जियमचा संघ जपानविरोधात 2 जुलैला एकमेकांशी लढणार आहेत.
FIFA World Cup 2018 : बेल्जियमची इंग्लंडवर 1-0 ने मात, दोन्ही संघ बाद फेरीत दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2018 10:01 AM (IST)
फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियम संघाने इंग्लंडला 1-0 ने पराभूत केले आहे. या सामन्यातल्या पराभवामुळं इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -