मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला गड कायम राखला. शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपचे अमितकुमार मेहता यांचा तब्बल 11 हजार 611 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.


दुसरीकडे शिक्षक मतदारसंघातही कपिल पाटील यांनी भाजपचा दारुण पराभव केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख या मतदारसंघात थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल

लोकभारतीचे कपिल पाटील यांना 4050, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांना 1736, तर भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांना 1124 मतं मिळाली.

मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने ताकद लावली. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता.

पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का

मुंबई पदवीधर निवडणुकीत विलास पोतनीस यांनी 19 हजार 403 मतं मिळवली. तर भाजपचे अमितकुमार मेहता यांना 7792 मतं मिळाली. एकूण कोटा 16 हजार 900 चा होता. म्हणजेच शिवसेनेने भाजपचा 11 हजार 611 च्या मताधिक्क्याने पराभव केला.

शिवसेनेने यावेळी या मतदारसंघातून कॅबिनेटमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट करत विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली होती.

संबंधित बातम्या

विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल  

कोकण पदवीधर: 23 तासांनी निकाल, निरंजन डावखरेंचा विजय!  

मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना, तर शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी  

दोन पैलवान सख्खे भाऊ एकाच महिन्यात विधानपरिषदेवर!