Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक 2022 (Fifa WC Cup 2022) च्या दुसऱ्या दिवशी इराण आणि इंग्लंड (England vs Iran) यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांमधील हा सामना खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. ज्यात इंग्लंडने इराणचा 6-2 असा (ENG vs IRA) तगडा पराभव केला. या सामन्यादरम्यान एक मजेदार गोष्ट घडल्याचं सर्वांनी पाहिलं. इंग्लंडचा खेळाडू जॅक ग्रीलिशने (Jack Grealish) गोल केल्यानंतर अनोखं सेलिब्रेशन केलं. जॅकनं गोल केल्यानंतर त्याचा टी-शर्ट काढला आणि थेट गर्लफ्रेंडजवळ पोहोचला. जॅकची गर्लफ्रेंड प्रेक्षकांमध्ये बसली होती आणि तिथे जाऊन जॅकनं तिला किस केली. 


जॅक ग्रीलिशच्या या सेलिब्रेशनचे (Jack Grealish Celebration) अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदा या विश्वचषकादरम्यान (Qatar Fifa World Cup 2022) कतार सरकारने अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नियमानुसार महिला चाहत्यांना खांदे आणि गुडघे झाकून बसावे लागते. इतकेच नाही तर पुरुषांच्या कपड्यांवरही बंदी आहे. याशिवाय टी-शर्ट काढण्यासही मनाई आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचा खेळाडू जॅक ग्रीलिशचा टी-शर्ट काढून केलेलं हे सेलिब्रेशन चर्चेचा विषय बनला आहे.


इंग्लंडचा दमदार विजय


सामन्याचा विचार करता इंग्लंड संघाने (Team England) सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 35 व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर 43 व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईमनंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत (45+1) गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी 3-0 ची मोठी आघाडी घेतली. हाल्फ टाईमनंतर 65 व्या मिनिटाला इराणच्या मेहदी तरेमीने गोल केला. पण इराण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार तोवरच 71 स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. 89 व्या मिनिटाला जॅक ग्रेयलिशने आणखी एक गोल करत इंग्लंडची आघाडी तब्बल 6 गोल केली. ज्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये (90+1) इराणकडून मेहदी तरेमीने पेनल्टीवर गोल केल्यामुळे इराणने 6-2 अशा फरकाने सामना गमावला. या विजयासह इंग्लंड संघाने ग्रुप B (Group B)मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं. 


हे देखील वाचा-