Fifa Awards : फिफाने (FIFA) यंदाच्या वार्षिक पुरस्कारांसाठी (Fifa Awards 2023) नामांकनांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूपासून सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि प्रशिक्षकापर्यंतची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला फुटबॉलपटूंसाठीही नामांकने आली आहेत. फिफा पुरस्कारांमध्ये 14 खेळाडूंना 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' या सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये लिओनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
लिओनल मेस्सी हा FIFA विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' होता. त्याला गोल्डन बॉल देण्यात आला. आपल्या संघाला विश्वचषक ट्रॉफी मिळवून देण्यात त्याची सर्वात मोठी भूमिका होती. अशा स्थितीत फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. त्याला पीएसजीचा सहकारी एमबाप्पेकडून सर्वात मोठे आव्हान असून एमबाप्पे फिफा विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. त्यांना 'गोल्डन बूट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्सी आणि एमबाप्पे व्यतिरिक्त नेमार, लुका मॉड्रिक, रॉबर्ट लेवांडोस्की आणि मोहम्मद सलाह या एकूण 14 खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो या स्टार खेळाडूचा समावेश नाही.
फिफा बेस्ट खेळाडू पुरुष
लिओनल मेस्सी, कायलियन एम्बाप्पे, ज्युलियन अल्वारेझ, ज्युड बेलिंगहॅम, करीम बेंझेमा, केविन डी ब्रुयन, आर्लिंग हॅलँड, अश्रफ हकिमी, रॉबर्ट लेवांडोस्की, सॅडियो माने, लुका मॉड्रिक, नेमार, मोहम्मद सलाह, विंची जूनियर.
फिफा बेस्ट पुरुष गोलकीपर
एमिलियानो मार्टिनेझ, अॅलिसन बेकर, थिबॉट कोर्टियस, एडरसन, यासिन बौनु.
फिफा बेस्ट प्रशिक्षक पुरुष संघ
लिओनेल स्कालोनी, पेप गार्डिओला, डिडिएर डेशॅम्प्स, कार्लो अँक्लोटी, वालिद रेग्रागुई.
हे देखील वाचा-