Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे अचानक तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या थंडीचा काही ठिकाणी मानवी जीवनावर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. या ठिकाणी कमाल तापमानात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. 


 सलग पाचव्या दिवशी परभणीत 10 अंशाच्या खाली तापमान


राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेल्यानं चांगलीच हुडहुडी वाढली आहे. त्यामुळं थंडीपासून वाचण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. परभणीत तापमानाच चांगलीच घट झाली आहे. सलग पाचव्या दिवशी परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. आज परभणीचे तापमान 9.4 अंशावर आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे.


नंदूरबार जिल्ह्यात तापमानात अचानक वाढ


नंदूरबार जिल्ह्यात तापमानात अचानक बदल झाला आहे. जिल्ह्याचे तापमान गेल्या 24 तासांमध्ये अचानक सहा अंशाने वाढले आहे. 24 तासाआधी नंदूरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम होता. गारा वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा 11 अंशा सेल्सिअस पर्यंत खाली आला होता. मात्र, आज तापमानाचा पारा तब्बल 17 अंशापर्यत वाढला आहे. तापमानात झालेल्या या अचानक बदलाचा परिणाम जनजीवन दिसत आहे.  अचानक थंडी कमी झाल्यामुळं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. काही प्रमाणात नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. एकीकडे हवामान तज्ज्ञांनी थंडी कायम राहील असा अंदाज वर्तवला  असताना, दुसरीकडे नंदुरबारमध्ये अचानक झालेली तापमान वाढ आश्चर्याचा विषय ठरत आहे.


पाहुयात कुठे किती तापमान? 
 
(अंश सेल्सिअसमध्ये) 


सोलापूर - 15.1
सातारा - 10.4
नाशिक -13
कोल्हापूर - 15.3
नांदेड - 14
औरंगाबाद - 9.8
जळगाव - 12.6
रत्नागिरी - 18
सांताक्रुज - 19.4 
कुलाबा - 20.8
उदगीर - 14.5 
पुणे - 9.2
महाबळेश्वर -11.5
डहाणू - 19.4
परभणी - 13
नागपूर - 12.5
बारामती - 10.4
मालेगाव - 15.6


सातत्यानं तापमान कमी जास्त होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Cold Weather : उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता, तर 'या' भागात पावसाचा अंदाज