झिम्बाब्वेत सुरु असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रशीदनं ही कामगिरी केली. रशीदनं या सामन्यात विंडीजच्या शाई होपला माघारी धाडत शंभर विकेट्सचा टप्पा गाठला.
याआधी मिचेल स्टार्कनं 2016 मध्ये 52 वन डेत शंभर विकेट्स पूर्ण केल्या होत्या. 19 वर्षाच्या रशीदनं 26 वन डे सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता. मात्र त्यानंतर त्यानं केवळ 18 वन डेत विकेट्सचं शतक पूर्ण केलं.
वन डेत सर्वात जलद शंभर विकेट्स घेणारे गोलंदाज :
- रशिद खान (अफगाणिस्तान) - 44 सामने
- मिचेल स्टार्क ( ऑस्ट्रेलिया) - 52 सामने
- सकलेन मुश्ताक ( पाकिस्तान) - 53 सामने
- शेन बाँड (न्यूझीलंड) - 54 सामने
- ब्रेट ली ( ऑस्ट्रेलिया) - 55 सामने