CWG Gold Medal Winners in Lawn Bowls : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Weightlifting Games 2022) भारतीय महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला. या खेळात प्रथम भारताने सुवर्ण जिंकलं असून अत्यंत मेहनतीने इथवर पोहोचलेल्या सामान्य महिलांनी ही कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना एका मुलाखतीदरम्यान याच महिलांना भावनेच्या भरात अश्रू अनावर झाले.
कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Weightlifting Games 2022) भारतीय महिलांनी लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला 17-10 च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच भारत लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ कमाल फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलं. त्यानंतर आता एका मुलाखतीत या महिलांनी आपले खास अनुभव शेअर केले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, आम्हाला इथवर पोहचण्यासाठी खूप टोमणे खावे लागले होते. काहींनी आम्हाला चेहरा बघून संधी दिली असं म्हणाले होते, तर काही टोमणे शब्दात सांगता येणार नाहीत असेही असल्याचं त्या म्हणाल्या. खेळाडू रूपा रानी म्हणाली आम्ही सर्वजणी वेगवेगळ्या खेळाडून होतो. पण अखेर आम्ही सुवर्णपदक मिळवलं असून इथवर पोहोचण्यासाठी आम्हाला खूप कष्ट सोसावे लागले. पण आम्ही पदक जिंकलं नसतं तर आमचं हे कष्ट कोणालाच दिसलं नसतं.
अंतिम सामन्यात 17-10 ने विजय
अंतिम सामन्यातही भारतीय महिलांनी कमाल खेळ दाखवला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघानी चुरशीची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने काही काळ आघाडी घेतली होती. पण 10 गुण आफ्रिकेचे असताना भारतानेही बरोबरी केली. 10-10 असा स्कोर झाल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ दाखवत 17 गुणांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकही गुण मिळवता आला नाही आणि भारताने 17-10 च्या फरकाने सामना जिंकला. याआधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला 16-13 च्या फरकाने मात दिल्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं होतं.
हे देखील वाचा -