Boycott Dobaaraa Trending : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चित्रपटांना बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरील बायकॉट ट्रेंड सोशल मीडियावर सध्या बायकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लाल सिंह चड्ढा आणि रक्षा बंधन या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत आहेत. तसेच पठाण आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटांना देखील बायकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा दोबारा हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तापसी आणि अनुराग यांनी केली होती. अनुराग आणि तापसी यांच्या ही ईच्छा आता नेटकरी पूर्ण करत आहेत. सध्या बॉयकॉट दोबारा हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement


एका मुलाखतीमध्ये तापसी आणि अनुराग असं म्हटले होते की, त्यांचा चित्रपट बॉयकॉट करा. आता ट्विटरवर #BoycottDobaaraa हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.


पाहा ट्वीट्स:














अनुराग कश्यपचा दोबारा हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यामधील अनेक कलाकारांनी चित्रपटामधील तापसीच्या अभिनयाचं कौतुक केलं.