EURO 2020 : 'युरो कप'च्या इतिहासात इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात इंग्लंडने डेन्मार्कवर 2-1 अशी मात केली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता रविवारी, 11 जुलैला इटलीसोबत इंग्लंडचा आपल्या पहिल्या जेतेपदासाठी मुकाबला होणार आहे. या जगप्रसिद्ध खेळाला जन्म देणाऱ्या इंग्लंडकडून त्याच्या चाहत्यांना ऐतिहासिक विजयाची अपेक्षा आहे.
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विजयासाठी डेन्मार्कने इंग्लंडला चांगलंच झुंजवलं. डेन्मार्कने शानदार खेळी करत एका गोलची आघाडी घेतली होती, पण नंतर इंग्लंडने खेळात जोरदार कमबॅक करत 2-1 ने विजय संपादन केला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 104 व्या मिनीटाला पेनल्टी वाचवल्यानंतर रिबाऊंड शॉटवर विजयी गोल केला आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
आता रविवारी इंग्लंडचा सामना इटलीशी होणार आहे. 1966 सालच्या विश्वचषकानंतर इंग्लंडच्या इतिहासातील हा पहिलाच अंतिम सामना असेल. इंग्लंडच्या पारड्यात केवळ 1966 सालचा विश्वचषक आहे. त्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धेत इंग्लंडला कधीही अंतिम सामन्यापर्यंत मजर मारता आली नाही. या दरम्यान, चार वेळा इंग्लंड युरो चषक वा विश्व चषकाच्या अंतिम सामन्यातपर्यंत गेला आहे, पण त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या :