Corona Cases Today : कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 817 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 7 लाख 9 हजार 557
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 98 लाख 43 हजार 825
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 60 हजार 704
एकूण मृत्यू : 4 लाख 5 हजार 28


देशामध्ये आता कोरोना संसर्गाचे नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. 7 जुलैपर्यंत देशभरात 36 कोटी 48 लाख कोरोना वक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 33 लाख 81 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 42 कोटी 52 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 टक्क्यांनी घटली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 



गुरुवारी राज्यात 9,558 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ 


राज्यात काल (गुरुवार) 9,558 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 8,899 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,81,167 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,625 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. 


डेल्टा नंतर आता 'लॅम्बडा'चा धोका


कोरोनाच्या भयंकर असलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या प्रभावातून आता कुठे जग बाहेर येत असताना पुन्हा जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या महाभयंकर अशा लॅम्बडा व्हेरिएंटचा शोध लागला असून तो डेल्टा प्लस व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार सध्या जगभरातील 30 देशांमध्ये झाला आहे. भारतात मात्र अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसल्याचं वृत्त आहे.  


लॅम्बडा या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उगम आफ्रिकेतल्या पेरु या देशात झाल्याचं सांगण्यात येतंय. या व्हेरिएंटला C.37 असं नाव देण्यात आलं असून याचा प्रसार मलेशिया, ब्रिटनसहित 30 देशांमध्ये झाला आहे. कोरोनामुळे सध्या सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या प्रमाणाबाबत  पेरु या देशाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. पेरुमध्ये मे आणि जूनमध्ये सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट सापडला असून त्यानंतर चिली या देशात याचा प्रादुर्भाव जास्त आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :