विशाखापट्टणम : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात 255 धावा करत भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 253 धावांवर गारद झाला. आता जर इंग्लंडला इथून सामना जिंकायचा असेल तर इतिहास रचला जाईल, त्यांच्या फलंदाजांना चमत्कार घडवावा लागेल कारण एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात कोणत्याही कसोटी सामन्यात झाला नाही. बॅझबॉल शैलीसाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळतो. खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. आता इंग्लंडला दोन दिवसांत आणखी 332 धावा करायच्या आहेत तर त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत.
भारतामधील पाच सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग
- 387/4 - भारताने इंग्लंडचा पराभव केला, चेन्नई 2008
- 276/5 - वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला, दिल्ली 1987
- 276/5 - भारताने वेस्ट इंडिजला हरवलं, दिल्ली 2011
- 262/5 - भारताने न्यूझीलंडला हरवलं, बंगळूर 2012
- 256/8 - भारताने ऑस्ट्रेलिया हरवलं ब्रेबॉर्न, 2010
आशियातील इंग्लंडच्या पाच सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग
इंग्लंडने भारतात कधीही 300 पेक्षा जास्त लक्ष्य गाठले नाही. चौथ्या डावात इंग्लंडची सर्वात मोठी धावसंख्या 241/5 आहे, जी 1964 मध्ये आली होती. हा सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडचा भारतासमोर सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग 208 धावांचा आहे, जो 1972-73 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर दिसला होता. भारताबाहेरही चौथ्या डावात इंग्लंडचा विक्रम काही विशेष राहिला नाही. इंग्रजांनी लाहोरमध्ये 209 धावा करून आशियातील सर्वात मोठा विजय मिळवला, तोही 1961 मध्ये. नवीन कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2022 मध्ये पाकिस्तानचे 8 विकेट्स वाचवून 167 धावांचे आव्हान चेस केले होते.
- 209/5 वि. पाकिस्तान - लाहोर (1961)
- 209/1 वि. बांगलादेश - मीरपूर (2009)
- 208/4 वि. भारत - दिल्ली (1972)
- 170/2 वि. पाकिस्तान - कराची (2022)
गिलचे शतक
रविवारी तिसऱ्या दिवशी भारताकडून शुभमन गिलने 104 धावा केल्या तर अक्षर पटेलने 45 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलीने 77 धावांत चार तर रेहान अहमदने 88 धावांत तीन बळी घेतले. जेम्स अँडरसनने 29 धावांत दोन बळी घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या