जखमेवर मीठ, इंग्लंडला कटक वनडेत संथ गोलंदाजीसाठी दंड
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 10:26 PM (IST)
कटक : कर्णधार इयॉन मॉर्गनच्या झुंजार शतकानंतरही इंग्लंडला कटकच्या दुसऱ्या वन डेत चूटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला. निसटत्या पराभवाच्या त्या जखमेवर सामनाधिकाऱ्यांनी आर्थिक दंडाचं मीठही चोळलं आहे. कटक वन डेत षटकांची गती संथ राखल्याबद्दल इंग्लंड संघाला हा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडानुसार कर्णधार इयॉन मॉर्गनच्या मानधनातून वीस टक्के, तर अन्य खेळाडूंच्या मानधनातून दहा टक्के रक्कम कापण्यात येईल, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. इंग्लंडला निर्धारित वेळेत 49 षटकंच पूर्ण करता आली होती. त्यामुळे आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी इंग्लंड संघाला आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.