मुंबई : इंग्लंडचा कसोटीवीर जेम्स टेलरला वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी वैद्यकीय कारणास्तव आपली क्रिकेटमधून संन्यास घ्यावा लागत आहे. जेम्सच्या हृदयाची स्थिती खूपच नाजूक असल्याचं वैद्यकीय चाचणीत आढळून आलं आहे.


 
2012 साली हृदयविकारामुळं फुटबॉलच्या मैदानातच निधन झालेला फॅब्रिस मुआम्बा आणि जेम्स टेलर यांच्या वैद्यकीय अहवालात खूपच साम्य आढळून आलं आहे. जेम्सला तातडीनं शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, त्याला सर्व स्तरावर क्रिकेटही थांबवावं लागणार आहे.

 

 



 
जेम्स टेलरनं आजवरच्या कारकीर्दीत सात कसोटी आणि 27 वन डे सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. इंग्लंडला त्याच्याकडून भविष्यात मोठी अपेक्षा होती.