केपटाऊन : एकेकाळचा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू लोनवाबो सोत्सोबेवर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 2015 साली दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत मॅच फिक्सिंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केलेला सोत्सोबे दक्षिण आफ्रिकेचा सातवा खेळाडू ठरला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याचवर्षी सोत्सेबेवर आरोप लागल्यानंतर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर ठेवलं होतं.

सोत्सोबेनेही त्याच्यावरील आरोप खरे असल्याचं स्वीकारलं आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सोत्सेबेवर भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य न करणं आणि पुरावे लपवणं यांसारखे आरोप होते. ज्यानंतर त्याच्यावर 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.