मुंबई: रिलायन्स जिओची समर सरप्राईज आणि धन धना धन ऑफर या महिन्याची शेवटी संपणार आहे. अशावेळी कंपनीनं आपला नवा प्लान आणला आहे. यामध्ये 349 आणि 399 रुपये किंमतीचा हा प्लान आहे. 399 च्या प्लानमध्ये तीन महिन्यांपर्यत यूजर्सला डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. म्हणजेच 309 रुपयात मिळणारी 'धन धना धन' ऑफर आता 399 रुपयात मिळणार आहे.
399 रुपयात 'धन धना धन' ऑफर
धन धना धन ऑफर सुरु ठेवण्यासाठी जिओ यूजर्संना यापुढे 399 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. 399 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला तीन महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 जीबी डेटा दररोज म्हणजेच 84 जीबी डेटा मिळणार आहे. कारण की, या प्लानची व्हॅलेडिटी 84 दिवसांची आहे.
याशिवय कंपनीनं आपल्या प्रीप्रेड यूजर्ससाठी 19 रुपयांपासून 9999 रुपयांपर्यंतचे प्लान आणले आहेत. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 56 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 56 जीबी डेटा मिळणार आहे. 506 रुपयांच्या प्लानमध्ये 112 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सेवा मिळणार आहे. ही ऑफर 56 दिवसांसाठी असणार आहे.
जर तुम्ही पोस्टपेड यूजर्स असाल तर 399 रुपयांच्या धन धना धन ऑफरचा अधिक फायदा मिळणार आहे. कारण की, पोस्टपेड यूजर्ससाठी 90 दिवस ही ऑफर असणार आहे. तर प्रीपेड यूजर्ससाठी ही ऑफर 84 दिवसांसाठी असणार आहे.