मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या अकराव्या मोसमात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये यंदा डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम लागू केली जाणार आहे.
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या बदलाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून यूडीआरएस प्रणालीचा वापर केला जातो आहे. त्यामुळे बीसीसीआयनंही आयपीएलमध्येही ही प्रणाली वापरण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सुपर लीगनंतर डीआरएस वापरणारी आयपीएल ही दुसरी लीग ठरणार आहे.
7 एप्रिलपासून आयपीएलचा अकरावा सीजन सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गजविजेत्या मुंबई चॅम्पियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर गेली दोन वर्ष बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता हे दोन्ही संघ पुन्हा आयपीएलमध्ये परतणार आहेत.
यंदापासून आयपीएलमध्येही डीआरएसचा वापर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2018 06:21 PM (IST)
आयपीएलच्या यंदाच्या अकराव्या मोसमात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये यंदा डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम लागू केली जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -