मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कृषीपंपांच्या वीजबिल वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.


महावितरणच्या वतीनं राज्यातील वीजबिलं थकवलेल्या शेतकऱ्यांची वीजतोडणी करण्यास सुरुवात केली आहे. याच्याच निषेधार्थ आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं.

त्यानंतर सभागृहात अजित पवारांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. आणि मुख्यमंत्र्यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिली.

"सध्या राज्यातील शेतकऱ्यांकडे 17 हजार कोटींची वीज बिलाची थकबाकी आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कृषीपंपांची वीज बिल वसुलीस मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगितीच्या सूचना देण्यात आल्या आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.