टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र तो या टीकेला शब्दाने उत्तर न देता थेट मैदानातूनच उत्तर देतो. त्याची स्टम्पिंग करण्याची शैली असो किंवा झेल पकडणं असो, या सर्वांमध्ये आजही त्याच चपळाईने खेळताना दिसतो.
सराव सत्रादरम्यानही अशीच झलक त्याने दाखवली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 24 वर्षीय हार्दिक पंड्याला त्याने मागे टाकलं. दरम्यान यापूर्वीही तो टीम इंडियाच्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये टॉप खेळाडूंमध्ये होता. युवा खेळाडूंपेक्षाही जास्त गुण धोनीला मिळाले होते.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेतही धोनीने कठीण परिस्थितीत दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला होता.