मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील पाच वन डे सामन्यांची मालिका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. रविवारच्या चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 11 धावांनी पराभव केला.
टीम इंडियाच्या पराभवाला सोशल मीडियावरुन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संथ गतीने केलेल्या फलंदाजीला जबाबदार ठरवलं गेलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर धोनी ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड नाराज असल्याचे दिसला. एकीकडे सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमधील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते, त्याचवेळी धोनी मात्र ड्रेसिंग रुममध्ये गपचूप बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.
या सामन्यात धोनीने 114 चेंडूत केवळ 54 धावांची खेळी केली. धोनीने या खेळीसह वनडे क्रिकेटमध्ये संथ गतीने अर्धशतक केल्याची नोंद केली. चौकार मारण्याच्या तयारीत असलेला धोनी बाद झाला आणि हातातला सामना टीम इंडियाने गमावला.
वेस्ट इंडिजसोबतच्या पाच वनडे समान्यांच्या सीरीजमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. त्यापेकी दोन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. आता राहिलेला एक सामना जिंकून टीम इंडिया सीरीजही जिंकू शकते. त्यामुळे 6 जुलै रोजी होणारा सामना निर्णायक असणार आहे.
https://twitter.com/CricGif17/status/881625413927133185