नवी दिल्ली : भारत आणि चीनमधले संबंध ताणले गेले असतानाच आता चीनने कुरापती सुरु केल्या आहेत. चीनने हिंदी महासागरात युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे. हिंदी महासागराच्या काही भागात चीनी पाणबुडी पाहिली गेल्याची माहिती आहे.


भारतीय सैन्य आणि चीनी पिपल्स लिबरेशन पार्टीत गेल्या महिन्याभरापासून तणावाचं वातावरण आहे. भारत-चीन सीमेवर सिक्कीमजवळ चीनने सैन्य वाढवलं असतानाच चीनकडून ही पावलं उचलली गेली आहेत. तणाव वाढल्यामुळे भारतीय सैन्यही सतर्क आहे. मोदींच्या भारत-अमेरिका भेटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे.

कशी आहे चीनी पाणबुडी?

युआन क्लासची पारंपरिक डिझेल आणि विजेवर चालणारी पाणबुडी भारताच्य पाणबुड्यांपेक्षा सामर्थ्यशाली
असल्याचं म्हटलं जातं. हिंदी महासागरात पाणबुडी सज्ज करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी सहा वेळा ही आगळीक केली आहे.