मुंबईः 'यूवीकॅन'च्या फॅशन शोसाठी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आमंत्रण देण्यात आलं, मात्र त्याने फोनच उचलला नाही, अशी नाराजी सिक्सर किंग युवराज सिंहने बोलून दाखवली आहे. युवीच्या 'यूवीकॅन' या कॅन्सर पीडितांना मदत करणाऱ्या संस्थेसाठी निधी जमा करण्यासाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमानंतर युवीला धोनीच्या उपस्थितीबाबत विचारण्यात आलं. धोनी सध्या खेळात व्यस्त असल्यामुळे फोन घेऊ शकला नाही, असं उत्तर देताना युवीने सांगितलं. 'यूवीकॅन'च्या फॅशन शोसाठी भारताचे तसेच परदेशातीन दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती होती.
युवराज गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. युवराजला संघात जागा न मिळल्यामुळे त्याच्या वडिलांनी जाहिरपणे धोनीवर टिकाही केली होती. मात्र यावेळी युवराजने धोनीच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला.