पुन्हा वर्दीवर हात, महिला वाहतूक पोलिसाला महिलेची मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 08:23 AM (IST)
मुंबई : पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका वाहतूक पोलिसाला मारहाण झाली आहे. विले पार्ले इथं एका महिला वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वार महिलेनं मारहाण केली आहे. नाकाबंदीदरम्यान ड्युटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाने, विनाहेल्मेट दुचाकीस्वार महिलेला अडवलं. मात्र त्याचवेळी महिलेने पोलिसांशी वादावादी सुरु केली. ही वादावादी मारहाणीपर्यंत पोहोचली. दुचाकीस्वार महिलेने थेट महिला वाहतूक पोलिसावर हात उचलला. विलेपार्लेच्या महिला संघ कॉलेजजवळ ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.