कर्नाटकातील कॉलेजचा तालिबानी फतवा, मुला-मुलींच्या बोलण्यावर बंदी
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 07:52 AM (IST)
बंगळुरु : कर्नाटकातील मंगलोरच्या एका कॉलेजने अजब फतवा काढला आहे. या कॉलेजने मुला-मुलींच्या बोलण्यावर बंदी लादली आहे. सेंट अलॉसिअस कॉलेजने हा तालिबानी फतवा काढला आहे. कॉलेजने काही दिवसांपूर्वी झालेल्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये मुला-मुलींसाठी नियम बनवले आहेत. या नियमांनुसार मुलं-मुली एकत्र फिरु शकत नाहीत. तसंच बोलण्यावरही निर्बंध लादले आहेत. काय आहेत नियम? *एकट्या मुलीने मुलांच्या समुहासोबत बोलू नये. *एकट्या मुलाने मुलींच्या समुहासोबत बोलू नये. *मुलं-मुली कोणत्याही पबमध्ये पार्टीसाठी जाऊ नये *कोणत्याही मुलीने दुपारी जेवणासाठी बाहेर जाऊ नये *कॉलेजच्या वेळेत कोणत्याही मुलीने दुसऱ्या वर्गातील मुलांना भेटू नये. *मुली फक्त हातावर मेहंदी लावू शकतात. *मेहंदी लावण्यापूर्वी वर्गशिक्षकाची परवानगी घ्यावी लागेल. कॉलेजच्या या फर्मानामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.