मुंबई : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने खाते उघडले. या दौऱ्यात अनेक नवोदित खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. त्यात धोनी सर्वात जास्त अनुभवी खेळाडू आहे. सध्या धोनीच्या परफॉमन्समुळे त्याच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण त्याने या मालिकेदरम्यान नऊ हजार धावांचा टप्पा पार केल्यास तो सर्वच टीकाकारांना उत्तर देऊ शकतो. शिवाय त्याला नव्या विक्रमाची संधी आहे.

 

झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघात धोनी हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भारतीय टीममधील धोनी वगळता 9 खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील 83 सामने खेळले आहेत. तर धोनीने एकूण 275 एकदिवसीय सामने खेळले आहेत. धोनीचा अनुभव 16 खेळाडूंपेक्षा जास्त असून, त्याने इतर खेळाडूंपेक्षा 192 पेक्षाएकदिवसीय सामने अधिक खेळले आहेत.

 

त्याने एकदिवसीय सामन्यांमधून 8918 धावा केल्या आहेत. त्याला 9000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 82 रन्सची गरज आहे. त्यामुळे त्याने या मालिकेत हा टप्पा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळू शकतो.

 

यापूर्वी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांनी हा टप्पा पूर्ण केला होता. त्यामुळे त्याने यामालिकेत नऊ हजार धावा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय ठरणार आहे.

यासोबतच त्याच्या नावावर आणखीन रेकॉर्ड नोंदवली जाऊ शकतो. त्याने जर नऊ हजारांचा टप्पा पूर्ण केल्यास तो जगातील तिसरा विकेटकीपर बॉटसमन ठरणार आहे. या पूर्वी हा मान श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला मिळाला होता.