मुंबई : यशराज फिल्म्सच्या ‘एक था टायगर’ आणि ‘सुलतान’ या दोन सिनेमांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आता पुन्हा एकदा यशराज फिल्म्ससोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.

 

सलमान खान धूमच्या आगामी सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘धूम 4’मध्ये सलमान खान भूमिका करणार असल्याची माहिती मिळते आहे. पुढल्यावर्षी या सिनेमाची शूटिंगही सुरु होण्याची शक्यता आहे.

 

‘सुलतान’ सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु असतानाच, आदित्य चोप्राने सलमान खानला धूम सिनेमाच्या सिक्वेलबाबत विचारलं होतं. 2017 च्या मध्यानंतर उत्तर अमेरिकेत धूमच्या चौथ्या सिक्वेलची शूटिंग सुरु होणार आहे.

 

धूमच्या चौथ्या सिक्वेलमध्ये सलमान खान काम करणार असल्याचे यशराज फिल्म्सने अद्याप अधिकृतपणे अद्याप सांगितलेले नाही.