मोहाली: न्यूझीलंड विरुद्ध मोहालीत खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा वन डे सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वन डे क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी बजावणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीननंच वन डेत 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.


धोनीनं वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केलाय. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर वन डेत 195 षटकार होते, तर धोनीनं वन डेत 196 षटकार ठोकले आहेत.

महेंद्रसिंह धोनीनं यष्टीरक्षणातला आपला विश्वविक्रमही आणखी उंचावला आहे. धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 151 यष्टीचीत बळी जमा झाले आहेत. धोनीनं वन डेत 91 वेळा, कसोटीत ३८ वेळा आणि टी-20मध्ये 22 वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे.

धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूंत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला.

संबंधित बातम्या:

तेंडुलकर, गांगुली, द्रविड, अझर आणि आता धोनी...!

टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात