आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव प्रकरण, एकनाथ शिंदेंसह शिवसेना नगरसेवकांची नवी मुंबईतील महापौर बंगल्यावर बैठक


हेडलाईन्स:

1. तालिबान्यांनी जारी केला दहशतीचा व्हिडिओ, ट्रक बॉम्बच्या स्फोटानं इमारत उडवून देतानाचे ड्रोन शूट सोशल मीडियावर व्हायरल

----------------------------------

2. राणीच्या बागेतल्या 8 पैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू, जिवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती, बालहट्टामुळे पेंग्विनचा जीव  गेल्याची नितेश राणेंची टीका

----------------------------------

3. खंडणीचा पैसा सैन्याला नको, पाकिस्तानी कलाकारांच्या वादातून उद्धव ठाकरेंचा मनसे-भाजपला टोला, तर प्रायश्चिताचा पैसा स्वीकारू नका, माजी लष्करी अधिकाऱ्यांचं मत
----------------------------------

4. नगरपालिका निवडणुकांचा धुराळा आजपासून उडणार, पहिल्या टप्प्यासाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरूवात

----------------------------------

5. नाशिकच्या तळेगावमधील मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर आज चार्जशीट दाखल होण्याची शक्यता, 8 ऑक्टोबरला घडली होती घटना

----------------------------------

6. मोहाली वन डे जिंकून टीम इंडियाची  मालिकेत 2-1 अशी आघाडी; कोहलीचं विराट शतक, तर धोनीलाही गवसला मिडास टच

----------------------------------

7. निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीत ताटातुट, अखिलेशकडून शिवपाल यांना मंत्रिमंडळातून डच्चू, तर मुलायम यांच्याकडून रामगोपाल यादवांची हकालपट्टी

----------------------------------

8. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, वर्ध्यातल्या कुणबी-मराठा मोर्चाच्या निवेदनात नवी मागणी, ओरोस, माणगाव, पालघरमध्येही मोर्चाची धडक

----------------------------------

9. पोहण्याच्या सरावादरम्यान नाशकातल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तर अश्विनी एकबोटेंवर पुण्यात अंत्यसंस्कार

----------------------------------