टोकियो : जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेचं निधन झालं आहे. 77 वर्षीय जुन्को ताबेई यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ताबेई यांचं कर्करोगामुळे निधन झालं.
जपानच्या जुन्को यांनी आयुष्यात 70 देशांतील विविध शिखरं पादाक्रांत केली होती. 16 मे 1975 रोजी माऊण्ट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करुन त्यांनी इतिहास रचला. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. इतकंच नाही, तर 1992 मध्ये सात द्वीपकल्पांच्या सर्वोच्च शिखरांना गवसणी घालणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
ताबेई यांचा जन्म 1939 मध्ये जपानच्या मिहारुमध्ये झाला होता. जगातल्या सर्व देशातील उंच शिखरं सर करणं, हे त्यांचं स्वप्न होतं. जपानमध्ये राहणाऱ्या पुरुषांना महिला सक्षमीकरणाची किंमत समजावी, अशी आशा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.