नवी दिल्ली : विजय शंकर आणि हर्षल पटेलच्या आतषबाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सनं चेन्नई सुपर किंग्सवर 34 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने चेन्नईसमोर 163 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना चेन्नई 20 षटकात फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला.


सुरुवातीला या सामन्यात चेन्नईनं दिल्लीची अवस्था 5 बाद 97 अशी दाणादाण उडवली होती. पण त्यानंतर विजय शंकर आणि हर्षल पटेलनं 65 धावांची अभेद्य भागीदारी रचून, दिल्लीला पाच बाद 162 धावांची मजल मारुन दिली. विजयनं 28 चेंडूत 36 तर हर्षलनंही 16 चेंडूत 36 धावांची खेळी उभारली.

चेन्नईकडून अंबाती रायडूने अवघ्या 29 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. पण त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.