जर्मनीच्या दृष्टीने दुसरी नामुष्की म्हणजे गतविजेत्यांना गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. विश्वचषकाच्या इतिहासात गतविजेत्या संघाला साखळीतच पराभूत व्हावं लागण्याची ही सहावी वेळ आहे.
विश्वचषकाच्या फ गटातून बाद फेरी गाठण्यासाठी जर्मनीला स्वीडनपेक्षा चांगल्या गोलफरकाने विजय मिळवणं आवश्यक होतं. एकीकडे स्वीडन मेक्सिकोचा 3-0 असा धुव्वा उडवत असताना, जर्मनीला दक्षिण कोरियाकडून 0-2 अशी हार स्वीकारायला लागली.
दक्षिण कोरियाकडून यंगग्वान किम आणि ह्यन्गमिन सॉन यांनी एन्जुरी टाईममध्ये एकेक गोल डागला.