India vs West Indies Playing 11 Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली. यावेळी भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे. स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली असून दीपक हुडाला (Deepak Hooda) संधी मिळाली आहे. या एका बदलासह भारत मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडीज संघानेही एक बदल केला असून ओडेन स्मिथच्या जागी डॉमनिक ड्रेक्सला घेऊन ते खेळत आहेत तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीजचा संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.
वन-डे मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला खरा पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता आज तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिके आघाडी घेऊ शकतो
हे देखील वाचा-