रिओ दि जनैरो : भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा कर्माकर ऑलिम्पिकच्या फायनलचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालीय. दीपानं व्हॉल्ट प्रकारात फायनल गाठली असून, आज भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी दीपाची कर्तबगारी भारतीयांना पाहता येणार आहे.

 

 

दीपा कर्माकरनं व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवून फायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं होतं. दीपानं व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली.

 
दुसऱ्या प्रयत्नात दीपानं 14.600 गुण मिळवले होते. 22 वर्षीय दीपा ऑलिम्पिकची फायनल गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे.