मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याण स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
दिवा ते कल्याणमध्ये डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यत दुरुस्तीची कामे.
दिवा ते कल्याणदरम्यानची डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक डाऊन स्लो मार्गावर.
लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने.
अप फास्ट मार्गावरील लोकल सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या दरम्यान 15 ते 20 मिनिटे उशिराने.
सर्व स्लो लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द.
हार्बर
कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक.
सकाळी 11.01 ते दुपारी 3.53 पर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप- डाऊन वाहतूक बंद.
अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.29 ते दुपारी 3.03 वाजेपर्यत पूर्णपणे बंद.
ब्लॉकदरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 3.53 पर्यंत सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यान दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद.
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल.
हार्बरचे प्रवासी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवरून प्रवास करू शकतील.