दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिर, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन कोल्टर नाईल, मुंबईचा सलामीवीर रणजी खेळाडू अखिल हेरवादकर, महिपाल लोमरोर आणि दिल्लीचा रणजीपटू पवन सुयाल यांना संघातून करारमुक्त केलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नेगीची कामगिरी गेल्या मोसमात निराशाजनक राहिली. आठ सामन्यांमध्ये त्याला केवळ 57 धावा करता आल्या. तर गोलंदाजीमध्ये नेगीने नऊ ओव्हरमध्ये 84 धावा दिल्या होत्या.
नेगीला संघाने करारमुक्त केलं आहे. त्याची किंमतही खूप आहे. शिवाय त्याचं प्रदर्शन देखील एक मुद्दा आहे, असं डेअरडेव्हिल्सच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
आयपीएल बोलीनंतर नेगीला टीम इंडियातही फारशी संधी मिळाली नाही. आशिया चषकात त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. तर टी-20 विश्वचषकादरम्यान अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान दिल्लीने मोहम्मद शमी, जयंत यादव, करुण नायर, रिषभ पंत, संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिस यांचा करार कायम केला आहे.