श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधल्या पम्पोरमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे सुपुत्र लान्सनायक सौरभ नंदकिशोर फराटे शहीद झाले आहेत. काल पम्पोरमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये लान्सनायक सौरभ फराटे यांचाही समावेश आहे.

सौरभ फराटे हे पुण्याजवळच्या फुरसुंगीचे रहिवाशी आहेत. गेल्या 13 वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलाच्या सेवेत आहेत. त्यांचा लहान भाऊसुद्धा सैन्यदलाच्या सेवेत आहे. सौरभच्या मागे त्याचे आई, वडील, पत्नी आणि दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. नुकतेच ते 2 महिन्याच्या सुट्टीवर घरी आले होते. 24 ऑक्टोबरला रोजी त्यांच्या मुलींचा पहिला वाढदिवस साजरा करून 8 दिवसापूर्वीच कामावर रूजू झाले होते.

भारताकडून झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं आपल्या दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु केल्या आहेत. पम्पोरमध्ये यापूर्वीही अनेकवेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत.

संबंधित बातम्या :

जम्मूत दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

जम्मूत सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

पम्पोरमध्ये 24 तासांपासून चकमक सुरु, शासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीर: लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद