Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग (Commonwealth Weightlifting Games 2022) स्पर्धेत पश्चिम बंगालच्या अचिंता शेउली (Achinta Sheuli) भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 20 वर्षाच्या अंचिता शेउलीनं वेटलिफ्टिंगच्या 73 किलो ग्राम वजन गटात दमदार कामगिरी करत बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावला. देशासाठी सुवर्ण जिंकल्यानंतर अंचितानं आपली प्रतिक्रिया दिलीय. या स्पर्धेत कोणत्याच खेळाडूकडून त्याला आव्हान मिळालं नाही. त्याची स्पर्धा स्वत:शीच होती, असं त्यानं स्पष्ट केलं.


अंचिता शेउलीनं काय म्हणाला?
कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 73 किलो वजन गटात अंचिता शेउलीनं 312 किलो ग्राम वजन उचलत विक्रम केला. त्यानं प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 10 किलो अधिक वजन उचललं. देशासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर एका क्रिडा वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अंचिता म्हणाला की, “मला कॉमनवेल्थ स्पर्धेत माझे सर्वोत्तम प्रदर्शन करायचं होतं. मी हे करण्यात यशस्वी झालो. माझी कधीच कुणाशी स्पर्धा नव्हती. माझी स्पर्धा माझ्याशीच होती. मलेशियाचा खेळाडू मला झुंज देऊ शकला असता. पण मी ठरवले होतं की मी माझे सर्वोत्तम द्यायचं आणि त्याचा पराभव करायचा.


स्वत:च्या कामगिरीवर खूश
"मला माझ्या कामगिरीत आणखी सुधराणा करायची होती. क्लीन एंड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात मी अयशस्वी ठरलो. परंतु, त्यानंतर मी आणखी एक प्रयत्न केला आणि यशस्वी झालो. मी माझ्या कामगिरीवर खूप खूश आहे.”


अंचितानं त्याच्या यशाचं श्रेय कोणाला दिलं?
अंचितानं त्याच्या यशाचं श्रेय तिचा मोठा भाऊ आणि तिच्या प्रशिक्षकाला दिलं. त्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या भावाला खूप संघर्ष करावा लागला, असं अंचितानं म्हटलंय. अंचिता शेऊलीचा मोठा भाऊ देखील वेटलिफ्टर आहे.


अंचिताचं पुढचं लक्ष्य काय?
कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर अंचिताची नजर ऑलम्पिक खेळात पदक जिंकण्यावर आहे. अंचितानं स्पष्ट केलंय की, तो ऑलंम्पिक स्पर्धेत त्याच्या वजन गटात कोणताही बदल करणार नाही. तो ऑलम्पिक स्पर्धेत 72 वटन गटातचं त्याचं नशीब आजमवणार असल्याचं त्यानं म्हटलंय. 


हे देखील वाचा-