Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीनं इंग्लंडला नमवून सुवर्णपदकावर झडप घातलीय. भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीनं (Satwik Sairaj Rankireddy and Chirag Chandrashekhar Shetty)  इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा  21-15, 21-13 असा पराभव केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 59 पदकं जिंकली आहेत. ज्यात 21 सुवर्ण, रौप्यपदक 15 आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. 


ट्वीट-



लक्ष्य सेनची सुवर्ण कामगिरी
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. 


पीव्ही सिंधूनं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं
कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय.


भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू-


सुवर्णपदक- 21 
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ,


रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.


कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान जी.


हे देखील वाचा-