CWG 2022 Medal Tally: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत ऑस्ट्रेलियानं सुरूवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर वर्चस्व गाजवलंय. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 155 पदकं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडच्या संघानंही पदकांचं अर्धशतक पूर्ण केलंय. एकूण 148 पदकांसह इंग्लंडचा संघ पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण किती पदकं जिंकली आहेत. तसेच पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 59 सुवर्णपदकासह एकूण 155 पदकं जिंकली आहेत. तर, 50 सुवर्णपदकासह एकूण 148 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनाडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनाडाच्या खात्यात आतापर्यंत 22 सुवर्णपदकासह एकूण 84 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (17 सुवर्ण, एकूण 44 पदक), पाचव्या क्रमांकावर भारत (13 सुवर्ण, एकूण 40 पदक), सहाव्या क्रमांकावर नायजेरिया (9 सुवर्ण पदक, एकूण 30 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलंड (8 सुवर्ण, एकूण 41 पदक), आठव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (7 सुवर्ण, एकूण 26 पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया (6 सुवर्ण, एकूण 15 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर जमैका (6 सुवर्ण, एकूण 12 पदक).
कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 पदकतालिका-
क्रमांक | देश | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण |
1 | ऑस्ट्रेलिया | 59 | 46 | 50 | 155 |
2 | इंग्लंड | 50 | 52 | 46 | 148 |
3 | कॅनडा | 22 | 29 | 33 | 84 |
4 | न्यूजीलंड | 17 | 12 | 15 | 44 |
5 | भारत | 13 | 11 | 16 | 40 |
6 | नायजेरिया | 9 | 8 | 13 | 30 |
7 | स्कॉटलंड | 8 | 9 | 24 | 41 |
8 | दक्षिण आफ्रीका | 7 | 8 | 11 | 26 |
9 | मलेशिया | 6 | 5 | 4 | 15 |
10 | जमैका | 6 | 4 | 2 | 12 |
हे देखील वाचा-