CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2018 07:51 AM (IST)
पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात भारताचा वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने 317 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं.
सिडनी : भारतीयांसाठी शनिवारची सकाळ खुशखबर घेऊन आली आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात भारताचा वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने सुवर्णपदक पटकावलं. सतीशने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. सतीशने स्नॅचमध्ये 144 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 173 किलो वजन उचललं. 25 वर्षीय सतीशने 2014 मधील ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे पाचवं पदक ठरलं आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदकं वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडलं, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला. दुसऱ्या दिवशी संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवत विश्वविक्रम रचला होता. तर अवघ्या 18 वर्षांचा वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर घातली होती. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक. संबंधित बातम्या :