IPL 2021 Final : IPL (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली.  


IPL 2021 Final Match: माहिची जादू कायम! धोनीच्या नेतृत्वात CSK ने चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं
 
फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडची एका हंगामातील तिसरी सर्वोच्च भागीदारी
चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी भागीदारीचा अनोखा विक्रम केला. या हंगामात दोन्ही फलंदाजांमध्ये सर्वाधिक 756 धावांची भागीदारी झाली. आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामातील ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. आयपीएल 2016 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 939 धावांची विक्रमी भागीदारी केली. यानंतर, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी आयपीएल 2019 मध्ये 791 धावांची भागीदारी केली होती. 


धोनीचा 300 वा टी -20 सामना
तत्पूर्वी, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super kings) चा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नं कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धच्या फायनलमध्ये उतरताच एक नवा इतिहास रचला. धोनीचा हा 300वा टी20 सामना होता. एवढे सामने खेळणारा तो जगातील दुसराच कर्णधार ठरला.  धोनी वगळता वेस्टइंडीजचा डॅरेन सॅमी 200 पेक्षा अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा एकमेव खेळाडू आहे.  धोनीने 213 सामन्यांमध्ये यलो ब्रिगेडचे नेतृत्व केले असून 130 विजय आणि 81 पराभव स्वीकारले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल 2010, 2011 आणि 2018 जिंकले आहे.


ऋतुराज गायकवाडचा दबदबा, ऑरेंज कॅप मिळवली
ऋतुराज गायकवाडनं फायनल सामन्यामध्ये 32 धावा केल्या. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ऋतुराजनं यंदाच्या आयपीएलमध्ये  635 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्यानं आपल्या खेळीनं संघाला अनेक विजय मिळवून दिले.