हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 175 धावा केल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपला फॉर्म कायम ठेवत या सामन्यातही अर्धशतक ठोकले. यंदाच्या आयपीएल मोसमात अखेरचा सामना खेळणाऱ्या बेयरस्टोला शून्यावर बाद करत चेन्नईने सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर आलेल्या मनीष पांडेने शानदार अर्धशतक झळकावत संघाला सुस्थितीत पोहोचविले.
या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईनं संथ सुरुवात केली. मात्र त्यानंतर वॉटसनने हैदराबादच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. रैनानं 38 धावा करत चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात चेन्नईला 9 धावांची गरज होती. केदार जाधवनं षटकार खेचत संघाला विजयासमीप नेले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला.
या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या 16 गुण जमा आहेत, त्यामुळे प्ले-ऑफच्या फेरीत दाखल होणारा चेन्नई संघ पहिला संघ ठरु शकतो.