मुंबई : काँग्रेसचे मुंबई उत्तर -पश्चिममधील उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारसभेत सहभागी होणं पैलवान नरसिंग यादवला चांगलंच महागात पडलं आहे. कारण निरुपम यांच्या प्रचारसभेत सहभागी झाल्याले त्याला महाराष्ट्र पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.


नरसिंग यादव हा मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहे. मात्र त्यानं काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली. सरकारी पदावर असताना राजकीय प्रचार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


याप्रकरणी अंधेरील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरसिंग यादवविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


ऑलिम्पिक पदक विजेता नरसिंह यादवची 2012 मध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये डीवायएसपी पदी निवड झाली होती. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सूवर्ण पदक जिंकल्यानंतर नरसिंह क्सास-1 पदाच्या नोकरीसाठी पात्र झाला होता. मात्र पदवीधर नसल्याने त्यावेळी नरसिंग सेवेत रुजू होऊ शकला नव्हता. दरम्यान उत्तेजक सेवन केल्याप्रकरणी नरसिंग यादववर आंतरराष्ट्रीय कुस्तीत 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.