चेन्नई : आयपीएलच्या आगामी मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सने माजी कसोटीवीर लक्ष्मीपती बालाजीला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून करारबद्ध केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स यंदा दोन वर्षांनंतर आयपीएलच्या रणांगणात पुनरागमन करत आहे.
2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. चेन्नईने मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंगला, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मायकल हसीला आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लक्ष्मीपती बालाजीची नियुक्ती केली आहे.
खेळाडूंमध्ये सीएसकेने यंदा महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजाला रिटेन केलं आहे. 27 आणि 28 जानेवारीला होणाऱ्या लिलावात चेन्नईची नजर दिग्गज खेळाडूंवर असेल. फिरकीपटून आर. अश्विनसाठी आम्ही प्रयत्न करु, असं धोनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.