Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फुटबॉल प्रेमींचा आवडता प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पुढच्या दोन वर्षांसाठी रिटायरमेंटचा कोणताही प्लॅन नाही. रोनाल्डोला आता युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.
फुटबॉल फेडरेशन ऑफ पोर्तुगालने (FPF) लिस्बन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोला पोर्तुगाल देशासाठी सर्वाधिक गोल केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या दरम्यान तो म्हणाला, 'माझा प्रवास अजून संपलेला नाही. मला विश्वचषक आणि युरोचा भाग व्हायचे आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे आणि माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे."
रोनाल्डोची यशस्वी कारकिर्द :
रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत पोर्तुगालसाठी 189 सामन्यांत 117 गोल केले आहेत. तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. यावेळी रोनाल्डोने आयर्लंडविरुद्ध गोल करत इराणचा फुटबॉलपटू अली दाईच्या 109 गोलचा विक्रम मागे टाकला. रोनाल्डो आता कतारमध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक 2022 मध्ये आपल्या देशाकडून खेळताना दिसणार आहे. ही त्याची 10वी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.
रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडबरोबरच राहणार
रोनाल्डो सध्या मँचेस्टर युनायटेडकडून क्लब फुटबॉल खेळतो. मागच्या सीझनमध्ये त्याने आपल्या जुन्या क्लबसाठी जबरदस्त खेळ दाखवला होता. मात्र, गेल्या वर्षी युनायटेडची एकूण कामगिरी काही विशेष नव्हती. यावेळी नवीन सीझन सुरू होण्यापूर्वीच, रोनाल्डो त्याच्या टीममध्ये असतानाच तो युनायटेड सोडू शकतो अशीही जोरदार चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या :
- Bhuvneshwar Kumar: 3 सामने...18 चेंडू...49 धावा, भुवनेश्वरची आकडेवारी विचार करायला लावणारी, गावस्करांचा इशारा
- Hardik Pandya : हार्दीकच्या ट्वीटची पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल