Cristiano Ronaldo, Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या धमाकेदार गोलच्या बळावर पोर्तुलागनं फिफा वर्ल्डकप क्वॉलिफायर्समध्ये लक्जमबर्गला 5-0 नं पराभूत केलं. या विजयासह पोर्तुगालचा संघ ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. पहिल्या स्थानावर 17 गुणांसोबत सर्बियाचा संघ आहे. तर पोर्तुगालच्या खात्यात 16 गुण आहेत. 


सर्बियाला आता फक्त एक सामना खेळायचा आहे. तर पोर्तुगालला आणखी दोन सामने खेळायचे आहे. सर्बियाची शेवटचा सामना नोव्हेंबरमध्ये पोर्तुगालच्या विरोधात आहे. तसेच पोर्तुगाल आणि सर्बियाच्या सामन्यापूर्वी पोर्तुगाल आणि आयर्लंडचा सामना खेळवण्यात येणार आहे. 



फर्स्ट हाफमध्ये रोनाल्डोनं डागले दोन गोल 


पोर्तुगालसाठी फर्स्ट हाफची सुरुवात शानदार ठरली. पहिल्या 13 मिनिटांमध्येच टीमला दोन पेनल्टी मिळाल्या. या दोन्ही वेळी रोनाल्डोनं पेनल्टी स्ट्रोकवर गोल डागला. पहिला गोल त्यानं आठव्या मिनिटाला आणि दुसरा गोल तेराव्या मिनिटाला डागला. त्यानंतर सतराव्या मिनिटाला ब्रूनो फर्नांडिजनं गोल डागत पोर्तुगालला 3-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हाफ टाइमपर्यंत हाच स्कोअर होता. 


दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डोनं हेडरनं गोल डागला 


सेकंड हाफमध्ये पोर्तुगालनं आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. 69व्या मिनिटाला जोआओ पालिन्हानं गोल डागला आणि संघाला 4-0नं आघाडी मिळवून दिली. फुल टाइमच्या तीन मिनिटांआधी रोनाल्डोनं सामन्यामध्ये आपला तिसरा गोल डागला आणि संघासाठी पाचवा गोल डागला. रोनाल्डोनं डागलेला हा गोल सर्वोत्कृष्ट गोल्सपैकी एक आहे. यानंतर लक्जमबर्ग संघ वापसी करु शकला नाही. अशाप्रकारे पोर्तुगालनं 5-0 नं सामना जिंकला. 


रोनाल्डोचा शानदार रेकॉर्ड 


रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही 58वी हॅट्रिक होती. यासोबतच त्यानं आणखी एक रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. रोनाल्डोनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 हॅट्रिक केल्या आहेत. त्याचा हा एक विश्व विक्रम आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूनं आपल्या देशाकडून खेळताना अद्याप हा कारनामा केलेला नाही. रोनाल्डोनं 2019 मध्ये लिथुआनियाच्या विरोधात नववी हॅट्रिक केली होती. यादरम्यान त्यांनी स्वीडनच्या स्वेन रीडेल (1923-1932) च्या रेकॉर्डची (9 हॅट्रिक) बरोबरी केली होती.