Ronaldo YouTube Channel: महान फुटबॉल खेळाडूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोने डिजिटल जगात प्रवेश केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोने आपले यूट्यूब चॅनल सुरू केले आहे आणि काही तासांतच लाखो लोकांनी त्याचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. 


क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) पहिला व्हिडीओ त्याच्या चॅनलवर शेअर केला होता. त्यानंतर अवघ्या 4 तासांत त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या जवळपास 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाखांवर पोहोचली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनेलचे नाव 'यूआर क्रिस्टियानो' आहे. त्याचे चॅनल सर्वात वेगाने सबस्क्राईब मिळवणारे चॅनल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 


क्रिस्टियानो रोनाल्डोचा पहिला व्हिडीओ- (Cristiano Ronaldo Youtube Channel)


क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या पहिल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये फुटबॉलपासून बाहेरच्या जगात आपला दिवस कसा घालवतो याची झलक दिली आहे. त्याने यूट्यूब चॅनेलबद्दल उत्साह व्यक्त केला आणि चाहत्यांशी अधिक चांगला समन्वय राखणे हा आपला उद्देश असल्याचे सांगितले. क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणाला की, मी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत बॉन्डिंगचा आनंद लुटला आहे. आता माझे YouTube चॅनल मला चाहत्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यात मदत करेल.


रोनाल्डोचा डिजिटल विश्वात पाऊल-


क्रिस्टियानो रोनाल्डोचा यूट्यूब आणि डिजिटल विश्वातील प्रवेश हे एक धोरणात्मक पाऊल म्हणता येईल. त्याचे फॅन फॉलोइंग आश्चर्यकारक आहे आणि जगातील लाखो लोक त्याला फॉलो करतात. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या फुटबॉल कारकिर्दीशी संबंधित आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित तथ्य लोकांसोबत शेअर करू शकेल. हे शक्य आहे की ते फुटबॉल विश्वातील सर्वाधिक सबस्क्राईब केलेले चॅनेल देखील बनू शकेल. रोनाल्डोला वैयक्तिक आधारावर त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधायचा आहे हा या वाहिनीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असू शकतो.


आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान-


रोनाल्डोने या 200 सामन्यांत 123 गोल्स केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याने पटकावला आहे. पोर्तुगालने युरो पात्रता स्पर्धेत सलग सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची पाटी कोरी ठेवली आहे. मागच्या वर्षी रोनाल्डोने 2025 पर्यंत अल नस्सरसोबत करार केला. यासाठी त्याला 200 मिलियन यूरो (1775 कोटी  रुपये) मिळणार आहेत. 


संबंधित बातमी:


ऑलिम्पिकआधी मोडकळीस आलेले घर अन् 80 लाखांची संपत्ती; सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता अर्शद नदीमने नीरज चोप्रालाही टाकलं मागे!


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस